E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस; श्रीनगर महामार्ग बंद
Samruddhi Dhayagude
09 May 2025
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून, गुरूवारी अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना घडल्या. रामबनमधील जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर (एनएच ४४) मोठ्या प्रमाणात चिखल साचल्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. मुसळधार पावसानंतर रामबन बाजारातही पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
गुरूवारी सकाळी ७.३० वाजल्यापासून हा रस्ता बंद आहे. अनेक वाहने चिखलात अडकली असून, त्यांना बाहेर काढण्यात येत आहे. दूरवर लांब वाहतूक कोंडीची समस्या आहे. मुसळधार पावसामुळे चिनाब नदीवरील रामबन येथील बागलिहार धरणाचे दोन आणि रियासी येथील सलाल धरणाचे एक दरवाजे उघडण्यात आले आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही धरणे बंद करण्यात आली होती.
रामबन बाजारपेठेत पूरसदृश्य स्थिती आहे. रामबन शहराजवळील चंबा-सिरी येथे दरड कोसळली, तर रामबन बाजारपेठेतील एका हॉटेलजवळ अचानक आलेल्या पुरामुळे अनेक वाहनांचे नुकसान झाले. त्यामुळे खराब हवामानात प्रवाशांनी राष्ट्रीय महामार्ग ४४ वरून प्रवास करू नये. हवामान सुधारेपर्यंत आणि रस्ता मोकळा होईपर्यंत राष्ट्रीय महामार्ग-४४ वरून प्रवास करणे टाळा, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.
दरम्यान, हवामान विभागाने ८ ते १२ मे दरम्यान जम्मू आणि काश्मीरमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागानुसार जम्मू-काश्मीरच्या काही भागात मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच, काही संवेदनशील भागात मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याची शक्यता आहे. याशिवाय, उत्तर प्रदेश-छत्तीसगडसह १९ राज्यांमध्ये वादळ आणि पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य प्रदेश आणि राजस्तानमधील २२-२२ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. मध्य प्रदेशातील सहा जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे.
Related
Articles
कर्ज वसुलीत चीन सर्वात मोठा देश
02 Jun 2025
बंगळुरु ९ वर्षांनी अंतिम फेरीत
30 May 2025
पुरंदर विमानतळाच्या विरोधात शेतकर्यांचे आंदोलन
03 Jun 2025
प्रेमचंद यांच्या ‘गोदान’मधून भविष्याचा वेध
31 May 2025
पाकिस्तानी टिकटॉकरची गोळ्या झाडून हत्या
03 Jun 2025
मराठवाड्यातील ६८० गावांत अतिवृष्टी
30 May 2025
कर्ज वसुलीत चीन सर्वात मोठा देश
02 Jun 2025
बंगळुरु ९ वर्षांनी अंतिम फेरीत
30 May 2025
पुरंदर विमानतळाच्या विरोधात शेतकर्यांचे आंदोलन
03 Jun 2025
प्रेमचंद यांच्या ‘गोदान’मधून भविष्याचा वेध
31 May 2025
पाकिस्तानी टिकटॉकरची गोळ्या झाडून हत्या
03 Jun 2025
मराठवाड्यातील ६८० गावांत अतिवृष्टी
30 May 2025
कर्ज वसुलीत चीन सर्वात मोठा देश
02 Jun 2025
बंगळुरु ९ वर्षांनी अंतिम फेरीत
30 May 2025
पुरंदर विमानतळाच्या विरोधात शेतकर्यांचे आंदोलन
03 Jun 2025
प्रेमचंद यांच्या ‘गोदान’मधून भविष्याचा वेध
31 May 2025
पाकिस्तानी टिकटॉकरची गोळ्या झाडून हत्या
03 Jun 2025
मराठवाड्यातील ६८० गावांत अतिवृष्टी
30 May 2025
कर्ज वसुलीत चीन सर्वात मोठा देश
02 Jun 2025
बंगळुरु ९ वर्षांनी अंतिम फेरीत
30 May 2025
पुरंदर विमानतळाच्या विरोधात शेतकर्यांचे आंदोलन
03 Jun 2025
प्रेमचंद यांच्या ‘गोदान’मधून भविष्याचा वेध
31 May 2025
पाकिस्तानी टिकटॉकरची गोळ्या झाडून हत्या
03 Jun 2025
मराठवाड्यातील ६८० गावांत अतिवृष्टी
30 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
3
चेरीचा हंगाम बहरला
4
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
5
सावरकरांचे विचार युवकांसाठी प्रेरणादायी
6
विदर्भ, मराठवाड्यात मान्सून दाखल